Maharashtra Gharkul Yojana 2025 | लाडकी बहिण घरकुल योजना (महाराष्ट्र)

महाराष्ट्र घरकुल योजना हि सन २०२५ मध्ये सुरु करण्यात येणार आहे तर हि योजना लाडकी बहिण योजनेमधून काढण्यात येणार आहे. तर घरकुल योजना २०२५ हि केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून हि योजना राबवली जाणार आहे. तर या योजनेसाठी फक्त महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या महिलानाचा या घरकुल योजनेचा लाभ घेता येणार आहे कारण हि योजना फक्त स्त्री (महिला) साठी आहे यामध्ये पुरुषांना लाभ मिळणार नाही. लाडकी बहिण घरकुल असे या योजनेचे नाव देण्यात आलेले आहे तर या योजने अंतर्गत एकूण 13 लाख घरकुल महाराष्ट्र महिलांना मिळणार आहे अशी बातमी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काढून माहिती देण्यात आलेली होते. पण या योजनेसाठी काही पात्रता असणार आहे कारण सर्वांनाच घरकुल देणे हे शक्य नाही त्यामुळे योजनेमध्ये नियम व अट आणि पात्रता हि असणार आहे.

Maharashtra Gharkul Yojana 2025 |लाडकी बहिण घरकुल योजना

लाडकी बहिण घरकुल योजना हि महाराष्ट्र राज्यात राबवली जाईल तर या योजनेमध्ये 13 लाख घरे देण्यात येणार आहेत. घरकुल योजना २०२५ हि लाडकी बहिण योजनेमधूनच काढली आहे. ज्या महिलांचे घरकुल पास होतील त्यांना घरकुल बांधकाम साठी केंद्र सरकार 1 लाख 30 हजार पर्यंत अनुदान देणार आहे परंतु नवीन जाहिरात आल्यावर आपल्याला या मध्ये बदल सुद्धा दिसणार आहे आणि महाराष्ट्र घरकुल योजने बद्दल इतर माहिती खाली देण्यात आली आहे.

योजनेचा विभागहि योजना केंद्र आणि राज्य सरकार कडून आहे
लाभार्थी उमेदवारफक्त महिला
लाभार्थी उमेदवाराचे ठिकाणमहाराष्ट्रातील महिला
घरकुल अनुदान1 लाख 30 हजार
एकूण घरकुल13 लाख
घरकुल योजना GRइथे क्लिक करा (जुना GR)

1. लाडकी बहिण घरकुल योजना कागदपत्रे

ज्या महिलांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतला आहे तत्यांनी जे कागदपत्रे लाडकी बहिण योजनेसाठी लागलेले होते ते सर्व कागदपत्रे ठेवायचे आहेत आणि इतर काही अधिक लागणारे कागदपत्रे तपासायचे आहेत.

  • तुमचा आधार कार्ड, रेशन कार्ड, जातीचा दाखला, रहिवासी दाखला, 7/12 उतारा, घर पट्टी, बँक खाते पासबुक इत्यादी.

2. लाडकी बहिण घरकुल योजना पात्रता

ज्या महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळाला आहे अशा महिलांना जास्त चिंता करायची गरज नाही कारण हि घरकुल योजना लाडकी बहिण योजने मधूनच काढण्यात आलेली आहे. वयाची अट किमान 21 वर्ष पाहिजे तसेच ज्या महिलांच्या नावावर 2 चाकी वाहन असेल तरी लाभ मिळणार आहे आणि महिलांच्या नावावर जमीन आणि टेलेफोन असेल तरी सुद्धा लाभ मिळेल आणि जर महिन्याला 15 हजार रुपये [पर्यंत कमावत असेल तरी लाभ मिळेल परंतु अजून नवीन वर्षाचा लाडकी बहिण घरकुल जाहिरात GR आलेला नाही त्यामुळे अजून हि माहिती नक्की नाही आहे या मध्ये काही बदल होवू शकतात त्याची अपडेट तुम्हाला इथेच देण्यात येणार आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करायची आवश्यकताच नाही.

लाडकी बहिण योजना

महाराष्ट्र महिलांना घरकुल सोबत अजून एक खूप चांगली खुशखबर देण्यात येणार आहे कारण लाडकी बहिण योजनेसाठी अगोदर महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये पैसे मिळत होते परंतु आता सन २०२५ पासून ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेत अशा महिलांना 2,100 रुपये दर महिना देण्यात येणार आहे असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. हि योजना २०२४ मध्ये सुरु करण्यात आलेली होती आणि या योजनेचा लाभ खूप महिलांना मिळाला आहे तर आताचा डिसेंबर चा सुद्धा लाडकी बहिण योजनेचे पैसे बँक खातेमध्ये आलेले आहेत.

अशा प्रकारे लाडकी बहिण घरकुल योजना सन २०२५ मध्ये आयोजित केली जाणार आहे या योजनेची जाहिरात GR आलेला नाही त्यामुळे प्रत्येक महिलांनी कृपया करून घरकुल योजनेचा जाहिरात GR ची वाट पहायची आहे त्यामध्ये सर्व माहिती दिली जाणार आहे.

2 thoughts on “Maharashtra Gharkul Yojana 2025 | लाडकी बहिण घरकुल योजना (महाराष्ट्र)”

Leave a Comment