नमस्कार, आजचा लेखामध्ये आपण लाडकी बहिण योजना इ.के.वाय.सी कसी करावी या बद्दल माहिती बघणार आहोत. महाराष्ट्र सरकार द्वारे “लाडकी बहिण योजना” सन २०२५ जुलै महिन्यात सुरु करण्यात आली होती. हि योजना फक्त महाराष्ट्र महिलांसाठी लागू होती आणि दर महिन्याला पात्र महिलांना 1,500 रुपये बँक खात्यात जमा होतात.

लाडकी बहिण योजना eKYC साठी शेवटची दिनांक हि १८ नोव्हेंबर २०२५ रोजी आहे. ज्या महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळतो, त्या महिलांनी आता इ.के.वाय.सी करणे गरजेचे आहे. तर हि इ.के.वाय.सी कसी करावी आणि शेवटची दिनांक या बद्दल संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.
Ladki Bahin Yojana eKYC Update
लाडकी बहिण योजना eKYC का करावी? कारण आता प्रत्येक घरामध्ये फक्त 2 महिलांना लाभ घेता येणार आहेत त्यामुळे हि इ.के.वाय.सी करावी लागणार आहे. एका घरातून लाभ घेणारी महिला: 1. विवाहित आणि 2. अविवाहित.
लाडकी बहिण इ.के.वाय.सी | Ladki Bahin Yojana eKYC Steps
तर ज्या महिलांची इ.के.वाय.सी अपूर्ण आहे त्या महिलांनी हि प्रक्रिया पहावी:
- सर्वात आधी तुम्हाला या अधिकृत संकेतस्थळावर जायचे आहे.
- इथे तुम्हाला वरती लाडकी बहिण योजना इ.के.वाय.सी अस दिसेल त्याचावर क्लिक करा.
- नंतर तुमचा समोर एक नवीन पेज येईल त्यामध्ये ज्या महिलेची इ.के.वाय.सी करायची आहे त्या महिलेचे आधार कार्ड नंबर भरा.
- खाली एक captcha येईल तो भरून खाली नियम व अटी आहेत तिथे ,मी सहमत आहेत त्याचावर क्लिक करा.
- आधार कार्ड वरती मोबाईल नंबर लिंक असेल त्याचावर एक OTP येणार आहे ते भरून घ्या.
- नंतर विवाहित महिलांनी आपल्या नवऱ्याचा आधार कार्ड नंबर टाका आणि अविवाहित महिलांना आपल्या बाबांचा आधार नंबर टाकायचा आहे.
- बाबांचे किंवा नवऱ्याच्या आधार नंबर वरती एक OTP येईल तो भरून घ्या.
- खाली तुम्हाला तुमचा जात विचारली जाईल आणि दोन प्रश्न विचारलेली आहेत तर त्यामध्ये होय हा पर्याय निवडा.
- आणि खाली सबमिट बटन वरती क्लिक करा आणि तुमची इ.के.वाय.सी पूर्ण होईल.
अशा प्रकारे आपण लाडकी बहिण योजनासाठी इ.के.वाय.सी करू सकतो, जर कोणत्याही महिलांना अडचण आल्यास आमचा सोबत संपर्क करावा.