नमस्कार, आजचा लेखामध्ये लाडकी बहिण घरकुल योजना 2025 या बद्दल माहिती देण्यात येणार आहे. केद्र सरकार आणि राज्य सरकार द्वारे लाडकी बहिण घरकुल योजना प्रकाशित करण्यात आली आहे. तर हि योजना लाडकी बहिण योजना मधून होणार आहे ज्या महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळतो अशा महिलांना आता घरकुल योजनेचा सुद्धा लाभ केंद्र सरकार व राज्य सरकार कडून मिळणार आहे. लाडकी बहिण घरकुल योजना मध्ये एकूण 13 लाख महाराष्ट्र महिलांसाठी घरकुल मजूर करण्यात येणार आहेत आणि मुख्यमंत्री आवास योजना मधून 6 लाख 50 हजार घरकुल मंजूर करण्यात आलेले होते अशा सर्व घरकुल मिळून महाराष्ट्र पात्र महिलांना जवळपास 20 लाख घरकुल मंजूर झालेले आहेत.
लाडकी बहिण घरकुल योजना : Ladki Bahin Gharkul Yojana 2025
योजनेचे नाव | लाडकी बहिण घरकुल योजना |
विभाग | केंद्र सरकार आणि राज्य सरकार |
योजनचे लाभार्थी | महाराष्ट्र महिला |
योजनेची सुरुवात | सन २०२५ |
योजनेसाठी अर्ज पद्धत | ऑफलाईन किंवा ऑनलाईन |
अनुदान रक्कम | 1 लाख 20 हजार ते 1 लाख 30 हजार रुपये (जुन्या GR नुसार आहे. नवीन GR आल्यावर नक्की किती आहे समजेल) |
लाभार्थी लिंग | फक्त महिला |
लाडकी बहिण घरकुल योजना मध्ये ज्या महिलांना लाभ घ्यायचा आहे अशा महिलांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे परंतु हि योजना सन २०२५ मध्ये सुरु करण्यात येणार आहे असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. या योजेसाठी बहुतेक अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने होणार आहे कारण लाडकी बहिण घरकुल योजनेसाठी अजून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यासाठी संकेतस्थळ (वेबसाईट) बनवली गेलेली नाही परंतु जर ऑनलाईन पद्धतीने हि योजना सुरु झाल्यावर खूप लवकर कामे होणार आहेत.
लाडकी बहिण योजना म्हणजे काय?
लाडकी बहिण हि योजना महाराष्ट्र गरीब महिलांसाठी हि योजना काढण्यात आली होती कारण या योजनेमधून महाराष्ट्र सरकार प्रत्येक महिलांना दर महीन १५०० देते त्यामुळे ज्या महिलांना पैशाची खूप गरज असते त्यांना या योजनेतून खूप मदत मिळते. लाडकी बहिण योजना हि सन २०२४ मध्ये दिनांक 01 जुलै २०२४ पासून सुरु करण्यात आलेली होती या योजनेतून खूप काही महिलांना मदत मिळाली आहे. लाडकी बहिण योजनेचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेले त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले त्यांना महिन्याला 1,500 रुपये रक्कम बँक खातेमध्ये यायायला सुरुवात झाली. ऑनलाईन अर्ज हे ऑक्टोबर 2024 पर्यंतच सुरु होते परंतु जर कि लाडकी बहिण घरकुल योजनासाठी लाडकी बहिण योजना मध्ये नोदणी करायची असल्यास अजून ऑनलाईन अर्ज सुरु करण्यात येईल. या वर्षी सन 2025 मध्ये ज्या महिलांचे अर्ज स्वीकारण्यात आलेले आणि त्यांना पैसे मिळतात अशा महिलांना आता 2,100 रुपये देण्यात येणार आहे. अशा प्रकारे हि लाडकी बहिण योजना सुरु करण्यात आलेली.
लाडकी बहिण घरकुल योजना म्हणजे काय?
लाडकी बहिण योजनेतूनच लाडकी बहिण घरकुल योजना काढण्यात आली आहे कारण महाराष्ट्र मध्ये खूप महिला गरिबी परीस्थिती मध्ये आहेत अशा महिलांना आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार महिलांना घरकुल सुद्धा देणार आणि दर महिल्याला लाडकी बहिण योजनामधून 2,100 रुपये सुद्धा देणार आहे. हि योजना महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या फक्त महिलांना मिळणार आहे या योजनेचा लाभ पुरुषांना मिळणार नाही. लाडकी बहिण घरकुल योजनेचा GR अजून जाहीर झालेला नाही परंतु सन २०२५ मध्ये एक GR काढण्यात येईल त्यामध्ये पात्रता, कागदपत्रे , अपात्र आणि खूप काही महत्वाची माहिती दिली जाणार आहे.
लाडकी बहिण घरकुल योजना अनुदान रक्कम : Ladki Bahin Gharkul Yojana Amount
लाडकी बहिण घरकुल योजनेमधून प्रत्येक महिलांना घर बांधकाम करण्यासाठी किती अनुदानाची रक्कम देण्यात येणार आहे त्याबद्दल माहिती खाली दिलेली आहे.
भागाचे नाव | अनुदान रक्कम |
ग्रामीण भाग | रु. 1,20,000 |
डोंगरी भाग | रु. 1,30,000 |
लाडकी बहिण घरकुल योजना कागदपत्रे : Ladki Bahin Gharkul Yojana Documents
1. सातबारा उतारा |
2. जातीचे प्रमाणपत्र |
3. आधार कार्ड |
4. रेशन कार्ड |
5. निवडणूक ओळखपत्र |
6. विद्युत बिल |
7. बँक खाते पासबुक |
लाडकी बहिण घरकुल योजना अर्ज : Ladki Bahin Gharkul Yojana Apply
- अर्ज करण्यापूर्वी तुमचा कडे दिलेली सर्व कागदपत्रे तयार पाहिजेत तरच तुम्ही लाडकी बहिण घरकुल योजनेमध्ये पात्र ठरणार.
- सर्वात अगोदर अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने स्वतःला ग्रामपंचायत मध्ये किंवा पंचायत समिती मध्ये जावून अर्जाचा नमुना घ्यायला लागणार आहे.
- अर्ज घेतल्यानंतर जर तुम्ही शिक्षित नसाल तर तुमचा नातेवाईक किंवा कोण शिक्षित असलेल्या माणसांकडे अर्ज हा भरून मागायचा आहे.
- अर्ज पूर्ण भरून झाल्यावर तुम्हाला अर्जासोबत सर्व कागदपत्राची प्रत जोडायची आहे कोणीही मूळ कागदपत्रे जोडू नका.
- अर्ज जमा झाल्यावर तुम्हाला काही दिवस वाट पहावी लागणार आहे कारण भरपूर प्रमाणात अर्ज येणार आहेत त्यामुळे जेवढे लवकर अर्ज करता येईल तेवढ लवकर तुमच काम होणार आहे.
- ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती मधून एक सरकारी माणूस तुमचा घरी जमीन आणि इतर वस्तू तपासायला येईल आणि त्यानंतर तुमचा खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे.
- पुढची प्रक्रीर्या तुम्हाला त्यांचाकडून कस करायचे हे सांगण्यात येणार आहे त्यामुळे काळजी करायची गरज नाही.
- अशा प्रकारे तुम्ही ऑफलाईन अर्ज भरू शकता.
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अजून लाडकी बहिण घरकुल योजनासाठी वेबसाईट काढण्यात आलेली नाही जर केद्र सरकार आणि राज्य सरकार द्वारे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट काढली तर इथे तुम्हाला अपडेट करण्यात येणार आहे तसेच इतर काही अडचणी आल्यावर तुम्ही संपर्क करा.
Gharkul yojana