जालना घरकुल मंजूर यादी 2024 ची जाहीर करण्यात आलेली आहे तर हि घरकुल यादी प्रधानमंत्री घरकुल योजनाची आहे. ज्या अर्जदारांनी प्रधानमंत्री घरकुल योजनासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज केले होते त्यांनी आपले नाव ग्रामपंचायत घरकुल मंजूर यादी मध्ये तपासून घ्यायचे आहे. ज्या अर्जदारांचे नाव घरकुल यादी मध्ये आले असेल त्यांना भारत सरकार कडून 1 लाख 20 हजार रुपये एवढी रक्कम घरकुल बांधकाम साठी देण्यात येणार आहे आणि हि रक्कम अर्जदाराचा बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल.
जालना जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025)
आजचा लेखामध्ये Jalna Gharkul Manjur List मध्ये घरी बसून ऑनलाईन पद्धतीने नाव कसे बघायचे या बद्दल माहिती देण्यात आलेली आहे. जर तुम्ही सुद्धा अर्ज केले आणि घरकुल मंजूर यादी ची वाट पाहता तर भारत सरकार कडून घरकुल यादी हि जानेवारी २०२५ ला जाहीर करण्यात आली आहे.
ऑनलाईन घरकुल मंजूर यादी पहा- इथे क्लिक करा |
प्रधानमंत्री घरकुल योजना यालाच प्रधानमंत्री आवास योजना असे सुद्धा म्हणतात. तर प्रधानमंत्री आवास योजना हि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाकडून 1 एप्रिल 2016 पासून जाहीर करण्यात आली. या योजनेतून बेघर आणि गरीब परिस्थितीत राहणाऱ्या नागरिकांना मदत मिळावी त्यासाठी हि घरकुल योजना सुरु केली होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करावा लागतो त्याच बरोबर सर्व कागदपत्रे अर्जदाराकडे असावीत तरच या योजनेचा लाभ मिळतो.
Jalna Gharkul Manjur List Check
ज्या अर्जदारांनी जालना जिल्हातून अर्ज केले आहे त्यांनी कसा प्रकारे घरकुल मंजूर यादी मध्ये नाव पहायचे या बद्दल माहिती खाली दिलेली आहे.
1. जालना जिल्हाची घरकुल मंजूर यादी बघण्यासाठी तुम्हाला (www.rhreporting.nic.in/netiay/SocialAuditReport/BeneficiaryDetailForSocialAuditReport.aspx) या संकेतस्थळावर क्लिक करायचे आहे.
2. त्यानंतर नवीन पेज वरती डाव्या बाजूने राज्य,जिल्हा आणि इतर पर्याय निवडायचे आहे.
3. सर्व प्रथम पहिला पर्याय मध्ये महाराष्ट्र निवडा, नंतर जिल्हा मध्ये जालना निवडा आणि त्याखाली जालना जिल्हाची सर्व शहर आणि गावाची नावे येतील तर कोणत्या गावाची घरकुल यादी बघायची आहे ते गाव निवडा.

4. त्यानंतर खाली सन मध्ये २०२४-२०२५ हे पर्याय निवडा व captcha भरा आणि सबमिट करा.
5. थोड्याच वेळाने पूर्ण गावाची घरकुल मंजूर झालेल्या अर्जदारांची नावे येणार आहेत त्यामध्ये तुमचे नाव आहे कि नाही हे तपासायचे आहे. घरकुल यादी मध्ये खूप अर्जदारांची नावे राहणार आहेत त्यामध्ये तुमचे नाव पहा.
जर घरकुल यादी मध्ये नाव आले असेल तर पुढची माहिती आणि प्रक्रीर्या काय करावी लागते या बद्दल माहिती ग्रामपंचायत मध्ये जाऊन विचारायची आहे. जर कोणत्याही राज्यची, जिल्हाची घरकुल मंजूर यादी पाहायला अडचण होत असेल तर आमचा सोबत संपर्क करा.
हे पण वाचा:
सोलापूर जिल्हाची घरकुल मंजूर यादी.
नागपूर जिल्हाची घरकुल मंजूर यादी.
1 thought on “जालना जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025) – Jalna Gharkul Manjur List”