Agri Stack Maharashtra – ॲग्री स्टॅक शेतकरी ओळखपत्र नोंदणी

नमस्कार, सर्व शेतकरी माणसांसाठी खूप महत्वाची माहिती आहे कारण आता कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी ॲग्री स्टॅक फार्मर रजिस्ट्री म्हणजेच शेतकरी ओळखपत्र काढणे खूप आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी कार्ड असेल त्यांनाच सरकारी योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा Agri Stack महाराष्ट्र शेतकरी ओळखपत्राची नोंदणी करायची असेल तर खाली दिलेली पूर्ण माहिती वाचावी.

महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी आता शेतकरी ओळखपत्र काढून ठेवावे कारण ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ओळखपत्र असेल त्यांनाच योजना मिळणार आहे असा भारत सरकार कडून खूप मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. Agri Stack Maharashtra नोंदणी करण्यासाठी या www.mhfr.agristack.gov.in अधिकृत संकेतस्थळावर जायचे आहे.

Agri Stack Maharashtra शेतकरी ओळखपत्र नोंदणी

महाराष्ट्र राज्यामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांनी फार्मर आय कार्ड (शेतकरी ओळखपत्र) काढण्यासाठी खाली दिलेली सर्व माहिती वाचा आणि तुमचा अर्ज हा घरी बसल्या मोबाईल मध्ये किंवा कॉम्पुटर मध्ये भरू शकता त्यासाठी खाली दिलेली पूर्ण माहिती वाचा.

Agri Stack Maharashtra Login
Agri Stack Maharashtra Login
  • सर्व प्रथम महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनी फार्मर ओळखपत्र काढण्यासाठी www.mhfr.agristack.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जायचे आहे.
  • इथे तुम्हाला “Farmer” वरती क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर खाली “Create New user Acount” वरती क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला नवीन नोंदणीसाठी काही माहिती विचारली जाईल ती पूर्ण भरायची आहे.
  • नंतर तुमचा आधार लिंक मोबाईल नंबर वरती OTP येईल ते टाकून नोंदणी करा.
  • नंतर लोगिन करण्यासाठी तुमचा मोबाईल आणि खाली पासवर्ड किंवा OTP टाका.
  • बाकी राहिलेली पूर्ण माहिती भरून घ्या आणि सबमिट वरती क्लिक करा.
  • अर्ज सबमिट केल्यावर तुमचा अर्ज pending मध्ये जाईल आणि काही दिवसानंतर अर्ज approved केला जाईल.

असा प्रकारे तुम्ही घरी बसून सुद्धा शेतकरी ओळखपत्र काढू शकता. सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे कि त्यांनी लवकरात लवकर येणाऱ्या नवीन योजनेचा लाभ घेण्यासाठी हा शेतकरी ओळखपत्र काढून घ्यावा.

Leave a Comment