महाराष्ट्रातील सर्व जिल्हाची, गावाची घरकुल मंजूर यादी ऑनलाईन तपासणे
Maharashtra Gharkul Manjur Yadi 2024-2025: महाराष्ट्रातून ज्या अर्जदारांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रधानमंत्री आवस घरकुल योजना साठी अर्ज केले होते त्यांची सन २०२४-२०२५ ची घरकुल मंजूर यादी आलेली आहे त्यामुळे इथे तुम्हाला घरकुल मंजूर यादी ऑनलाईन कसी तपासायची या बद्दल पूर्ण माहिती मिळणार आहे. या माहिती मुळे तुम्ही महाराष्ट्र मध्ये सर्व जिल्हाची, गावाची मंजूर यादी तपासू शकता. ज्या अर्जदाराचे नाव घरकुल यादी मध्ये आलेलं असेल त्याला घरकुल बांधकाम साठी 1 लाख 20 हजार रुपये एवढे भारत सरकार कडून रक्कम मिळणार आहे.

ऑनलाईन घरकुल योजना मंजूर यादी तपासा
ज्या अर्जदारांनी घरकुल योजना साठी अर्ज केले असतील तर त्यांची मंजूर यादी आलेली आहे. ज्या अर्जदाराचे मंजूर यादी मध्ये नाव आलेलं असेल त्यांना घरकुलसाठी एकूण 1 लाख 20 हजार रुपये रक्कम देण्यात येणार आहे. आपले घरकुल मंजूर झाले कि नाही हे तपासण्यासाठी खाली दिलेली पूर्ण माहिती वाचा आणि सांगितल्याप्रमाणे तुमचे सुद्धा यादी मध्ये नाव पहा.
ऑनलाईन घरकुल योजना मंजूर यादी – इथे क्लिक करा. |
Step 1: कोणत्याही जिल्हाची घरकुल मंजूर यादी पाहण्यासाठी तुमचाकडे मोबाईल किंवा कॉम्पुटरची सुविधा असायला पाहिजे तरच तुम्ही हि ऑनलाईन घरकुल यादी घरी बसल्या बघू शकता. ऑनलाईन घरकुल मंजूर यादी पाहण्यासाठी वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे.
Step 2: त्या नंतर तुमचा समोर एक नवीन पेज येईल त्या मध्ये अर्जदाराचे राज्य, जिल्हा, शहर आणि गाव हि माहिती निवडायची आहे. त्या नंतर खाली सन आणि योजनेचे नाव इत्यादी माहिती फोटो मध्ये दिल्याप्रमाणे निवडायची आहे.

Step 3: हि सर्व माहिती बरोबर निवडून झाल्यावर तुमचा समोर खाली एक captcha येईल तो भरून घ्यायचा आहे आणि नंतर सबमिट बटन वरती क्लिक करा. थोड्याच वेळात तुमचा गावाची घरकुल मंजूर यादी pdf मध्ये येईल ती pdf तुम्ही मोबाईल किंवा कॉम्पुटर मध्ये डाऊनलोड करून घ्यायची आहे.
असा प्रकारे तुम्ही घरी बसून सुद्धा घरकुल यादी बघू शकता. ज्या अर्जदाराने घरकुल मिळवण्यासाठी अर्ज केले होते त्यांनी आपले नाव आले कि नाही हे पाहायचे आहे जर यादी मध्ये नाव आलेलं असेल तर पुढची प्रक्रीर्या जवळच्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन विचारायची आहे. जर तुम्हाला सुद्धा घरकुल मिळवायचा असेल तर त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागेल त्यानंतर सर्व कागदपत्रे असायला पाहिजे.