प्रधानमंत्री आवास योजना साठी ज्या अर्जदारांनी सन 2024-2025 मध्ये अर्ज केले त्यांची घरकुल मंजूर यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्या अर्जदारांना आपले घरकुल यादी मध्ये नाव पहायचे आहे त्यांनी खाली दिलेली पूर्ण माहिती वाचा. आजचा लेखामध्ये आपण नांदेड जिल्हाची घरकुल मंजूर यादी ऑनलाईन तपासणार आहेत तर ज्या अर्जदारांनी नांदेड जिल्हामधून अर्ज केले त्यांचासाठी हि माहिती खूप महत्वाची आहे.
नांदेड जिल्हाची घरकुल मंजूर यादी
प्रधानमंत्री घरकुल योजना मधून सरकार कडून 1 लाख 20 हजार रुपये घरकुल बांधकाम साठी देण्यात येतात परंतु या घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. अर्ज केल्यावर भारत सरकार कडून अर्जाची मंजूर देण्यात येते परंतु जर पात्र असेल तरच घरकुलाचा लाभ मिळतो.
ज्या अर्जदारांनी अगोदर घरकुल योजना साठी अर्ज केले होते त्यांची यादी आली आहे तर त्यामध्ये नाव कसा प्रकारे बघायचे हे आज इथे पाहणार आहोत तर सर्वात आधी आपण महाराष्ट्र नादेद जिल्हाची यादी तपासणार आहोत. जर तुम्हाला सुद्धा घरकुल मंजूर यादी मध्ये नाव बघायचे असेल तर खाली दिलेली पद्धतीने पाहू शकता.
घरकुल मंजूर यादी कोणत्याही राज्याची, जिल्हाची, शहराची किंवा गावाची घरी बसून यादी पाहू शकता कारण भारत सरकार कडून हि घरकुल यादी ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिली आहे. यादी पाहण्यासाठी खाली दिलेली प्रक्रीर्या वाचावी.
Nanded Gharkul Manjur List – नांदेड घरकुल मंजूर यादी ऑनलाईन पहा
नांदेड घरकुल मंजूर यादी ऑनलाईन पाहण्यासाठी खाली दिलेली माहिती वाचा आणि त्याच प्रमाणे कोणत्याही राज्यची जिल्हाची गावाची यादी पाहू शकता. हि घरकुल यादी तुम्ही मोबाईल मध्ये किंवा कॉम्पुटर मध्ये पाहू शकता.
ऑनलाईन घरकुल योजना मंजूर यादी- इथे क्लिक करा |
- नांदेड मध्ये राहणाऱ्या अर्जदारांनी घरकुल योजनाची मंजूर यादी तपासण्यासाठी वरती दिलेली लिंक वर क्लिक करायचे आहे.
- इथे क्लिक केल्यावर तुम्हाला नवीन पेज वरती घेऊन जाईल तिथे डाव्या बाजूने राज्य, जिल्हा, शहर, आणि गावाचे नाव हे सर्व पर्याय निवडायचे आहे. (उदा. राज्य- महाराष्ट्र, जिल्हा- नांदेड, आणि तुमचा शहराचे नाव व गावाचे नाव.)

- त्या नंतर तुम्हाला सन निवडायचे आहे आणि योजनेचे नाव निवडा व एक captcha येईल तो भरा आणि सबमिट बटन वरती क्लिक करा.
- नंतर तुमचा गावाची घरकुल मंजूर झालेल्या अर्जदारांनी नावे येतील त्यामध्ये खूप लोकांची नावे येणार आहे तर त्यात तुमचे नाव काळजीपूर्वक पहा.
जर तुमचे नाव घरकुल मंजूर यादी मध्ये आलेलं असेल तर तुम्हाला पुढची प्रक्रीर्या हि ग्रामपंचायत मध्ये जाऊन विचारायची आहे. असाच पद्धतीने कोणत्याही जिल्हाची घरकुल यादी ऑनलाईन चा माध्यमाने पाहू शकता.