लाडकी बहिण योजनेचा सातवा हफ्ता कधी पर्यंत बँक खातेमध्ये जमा होणार? : Ladki Bahin 7va Hafta

Ladki Bahin 7va Hafta: लाडकी बहिण योजनाचा नवीन वर्षाचा अजून 7 वा हफ्ता आलेला नाही, तर कधी येणार लाडकी बहिणीचा 7 वा हफ्ता. माझ्या लाडकी बहिण योजनेचा जानेवारी चा हफ्ता 26 जानेवारी 2025 पर्यंत सर्व लाभार्थी महिलांचा बँक खात्यात पैसे जमा होतील असे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांचा कडून सांगण्यात आलेले आहे.

योजनेचा नावलाडकी बहिण योजना
रक्कम1,500 रुपये किंवा 2,100 रुपये
कितवा हफ्ता7 वा हफ्ता (जानेवारी 2025)
लाभार्थीमहाराष्ट्रातील महिला
एकूण हफ्तेएकूण 6 हफ्ते मिळाले
एकूण रक्कमआता पर्यंत 9,000 रुपये मिळाले

हे पण वाचा: लाडकी बहिण योजनेचा जानेवारी हफ्ता कधी येणार, रक्कम 1,500 मिळणार कि 2,100 रुपये?

लाडकी बहिण योजना 7 वा हफ्ता (जानेवारी 2025)

महाराष्ट्र सरकार कडून ३६९० कोटी रुपये मान्यता मिळाली आहे तर आता नवीन वर्षाचा हफ्ता लाडकी बहिणीला मिळणार आहे तर हा हफ्ता 26 जानेवारी 2025 पर्यंत सर्व महिलांना मिळणार आहे आता काही दिवसात हळू हळू महिलांचा खात्यामध्ये पैसे जमा होतील. लाडकी बहिण योजना मधून खूप महिलांना लाभ मिळाला आहे आता पर्यंत एकूण 6 हफ्ते मिळाले आहेत त्यामुळे 7 वा हफ्ता सुद्धा मिळणार आहे. लाभार्थी महिलांनी काही काळजी करायची गरज नाही कारण 7 वा हफ्तेची रक्कम सरकार कडून मान्य झाली आहे त्यामुळे आता एक दोन दिवसात पैसे येण्यास सुरुवात होईल.

लाडकी बहिण योजना 7 वा हफ्ता किती पैसे येणार?

माझी लाडकी बहिण योजना हि सन २०२४ मध्ये जुलै महिन्याला सुरुवात केलेली होती ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज केले होते त्यांना पहिला हफ्ता सोबतच जुलै आणि ऑगस्ट चे पैसे 3,000 रुपये मिळाले होते. आता पर्यंत दर महिन्याला 1,500 रुपये रक्कम म्हणून महाराष्ट्र सरकारने महिलांना दिलेले आहेत. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कडून लाडकी बहिण योजनेचे पैसे वाढवण्यात येणार असी घोषणा केली होती. सन २०२५ मध्ये लाभार्थी महिलांना 2,100 रुपये देण्यात आश्वासन दिले होते तर अजून नवीन वर्षाचा पहिला म्हणजे 7 वा हफ्ता जमा झालेला नाही त्यामुळे अजून किती पैसे येणार हे कोणालाच माहित नाही.

लाडकी बहिण योजना नवीन अर्ज कधी पासून सुरु?

लाडकी बहिण योजनेसाठी खूप महिलांनी अर्ज केले होते त्यांना लाभ सुद्धा मिळाला आहे परंतु खूप महिलांनी अर्ज केल परंतु काही कारणामुळे त्यांचे अर्ज मंजूर झालेले नाही आणि महाराष्ट्र सरकार द्वारे सुद्धा अर्ज स्वीकारण्यात बंद केले होते. तर खूप महिलांचा मनात शंका आहे कि लाडकी बहिण योजनेचे नवीन अर्ज कधी सुरु होणार? महाराष्ट्र सरकार कडून या विषयावर चर्चा करण्यात आलेली आहे कारण महाराष्ट्र सरकार चा एकाच उद्देश आहे कि ज्या गरजू महिला आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळावा त्यामुळे सरकार एकदा परत अर्जाची लिंक चालू करणार आहे. ज्या महिलांनी अर्ज केले नाहीत किंवा अर्ज केले परंतु रद्द झालेत अशा महिलांनी खाली पूर्ण पात्रता कागदपत्रे बद्दल माहिती बघून घ्यायची आहे.

हे पण वाचा: माझी लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज | Mazi Ladki Bahin Yojana Apply.

Leave a Comment