लाडकी बहिण योजनेचा जानेवारी हफ्ता बद्दल माहिती
Ladki Bahin January 2025 Update: लाडकी बहिण योजना मधून महाराष्ट्र महिलांना जुलै पासून ते डिसेंबर 2024 पर्यंत दर महिन्याला महाराष्ट्र महिलांना 1,500 रुपये देण्यात आलेले. तर हि योजना सुरूच असणार आहे परंतु नवीन वर्षाचा जानेवारीचा हफ्ता अजून बँक खातेमध्ये महिलांच्या जमा झाला नाही त्यामुळे महिलांना आता काळजी व्हायला लागली आहे. प्रत्येक महिलांचा मनात हेच चालू आहे कि नवीन वर्षाचे पैसे येणार कि नाही, तर महिलांनो घाबरू नका कारण हि योजना बंद केली जाणार नाही आणि तुम्हाला लाडकी बहिण योजनेचे पैसे हे २० तारीख चे नंतर यायला सुरुवात होतील.
डिसेंबर चा हफ्ता सुद्धा खूप नंतर बँक खातेमध्ये जमा झाला होता तर आता पर्यंत लाडकी बहिण योजना मध्ये एकूण सहा हफ्ते मिळाले आहेत म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर असे एकूण 6 महिन्याची रक्कम आता पर्यंत मिळाली आहे तर एकूण 6 महिन्याची रक्कम प्रत्येक महिलांना 9,000 रुपये आता पर्यंत मिळालेले आहेत.
महाराष्ट्र सरकार कडून एक नवीन नियम सुरु होणार होता त्यामध्ये आता लाडकी बहिण योजनासाठी रक्कम वाढवण्यात येणार होती त्यामुळे सुद्धा जानेवारीचा हफ्ता यायला वेळ लागला असेल कारण आता सन 2025 मध्ये लाडकी बहिण योजनेतून ज्या महिला लाभ घेत आहेत त्यांना अगोदर 1,500 रुपये मिळत होते परंतु आता 2,100 देण्यात येणार आहे असे महराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचाकडून घोषणा केली गेली होती. त्यामुळे सुद्धा हफ्ता यायला वेळ लागला असेल परंतु महिलांनी चिंता करू नका कारण सातवा हफ्ता म्हणजे जानेवारी चा हफ्ता मिळेलच त्यामुळे काळजी करू नका आता थोडेच दिवसातून एक एक महिलांना त्यांचा बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील.
2,100 रुपये कधी पासून मिळणार?
महाराष्ट्र सरकार कडून सन 2025 मध्ये महिलांना 2,100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते परंतु अजूनही नवीन वर्षाचा जानेवारी चा हफ्ता आलेला नाही त्यामुळे अजून सांगता येत नाही जर कोणत्याही महिलांना पैसे आल्यावर समजणार आहे कारण सर्व महिलांना समान सारखेच पैसे या योजनेतून देण्यात येणार आहेत त्यामुळे कोणत्याही महिलाला कमी जास्त पैसे होणार नाही.
2 thoughts on “लाडकी बहिण योजनेचा जानेवारी हफ्ता कधी येणार, रक्कम 1,500 मिळणार कि 2,100 रुपये?”