माझी लाडकी बहिण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) हि महाराष्ट्र सरकार कडून नवीन योजना काढण्यात आलेली होती या योजनेचे नाव माझी लाडकी बहिण योजना असे आहे. या योजनेमधून महाराष्ट्र मध्ये राहणाऱ्या महिलांना दर महिन्याला पैसे महाराष्ट्र सरकार कडून देण्यात येतात. माझी लाडकी बहिण योजनासाठी नवीन अर्ज स्वीकारण्यात बंद केले आहे परंतु महाराष्ट्र सरकार कडून लवकरच अर्ज सुरु करण्यात येणार आहेत. लाडकी बहिण योजना महाराष्ट्र मध्ये 01 जुलै 2024 रोजी या तारीखेला योजना सादर केली होती. हि योजना फक्त महाराष्ट्र महिलांसाठी लागू होणार होती त्यामुळे या योजनेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात आलेले. अर्जाची सुरुवात हि 01 जुलै 2024 पासून सुरु होते आणि अर्जाची शेवटची दिनांक हि 15 ऑगस्ट 2024 रोजी होती.
माझी लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज 2025 | Mazi Ladki Bahin Yojana Apply
Mazi Ladki Bahin Yojana Apply (लाडकी बहिण योजनासाठी अर्ज) हे ऑनलाईन पद्धतीने Narishakti Doot या ऍप आणि ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाइट वरती करण्यात आलेले परंतु आता या योजनेसाठी अर्ज बंद केलेत परंतु खूप साऱ्या महाराष्ट्र गरजू महिलांना अर्ज भरता आलेले नाही कारण त्यांचाकडे कागदपत्रे नव्हती त्यामुळे या योजनेचा लाभ घेता आला नाही. चिंता करायची गरज नाही कारण खूप साऱ्या महिलांचे अर्ज अजून बाकी आहेत त्यामुळे परत एकदा ऑनलाईन वेबसाईट सुरु करण्यात येईल त्या वेळी तुम्ही सगळी कागदपत्रे तयार ठेवायची आहेत आणि लवकरात लवकर अर्ज भरावे.
माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ किती?
ज्या महिलांचे अर्ज मान्य झालेत अशा महिलांना ऑगस्ट 2024 पासून दर महिन्याला 1,500 रुपये त्यांचा बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले हे पैसे महाराष्ट्र सरकार द्वारे पाठवण्यात आलेले होते. ज्या महिलांचे अर्ज नंतर मंजूर झाले तरी सुद्धा सगळ्या महिलांना सारखेच पैसे देण्यात आलेले आहेत. आता पर्यंत मिळालेले माझी लाडकी बहिण योजनाचे पैसे किंवा हफ्ता खाली दिलेला आहे.
महिना | रक्कम |
जुलै आणि ऑगस्ट २०२४ (1 आणि 2 हफ्ता) | एकूण 3000 रुपये मिळाले. जुलै महिना: 1,500 रुपये ऑगस्ट महिना: 1,500 रुपये |
सप्टेंबर २०२४ (3 हफ्ता) | 1,500 रुपये |
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२४ (4 आणि 5 हफ्ता) | एकूण 3000 रुपये मिळाले. ऑक्टोबर महिना: 1,500 रुपये नोव्हेंबर महिना: 1,500 रुपये |
डिसेंबर २०२४ (6 हफ्ता) | 1,500 रुपये |
आवश्यक लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- अधिवास प्रमाणपत्र / जन्म प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला (अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे १५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड/ मतदार ओळखपत्र/ जन्म प्रमाणपत्र/ शाळा सोडल्याचा दाखला)
- उत्पन्न प्रमाणपत्र / पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड
- अर्जदाराचे हमीपत्र
- बैंक पासबुक
- अर्जदाराचा फोटो
- महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे अधिवास प्रमाणपत्र / १५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड/ मतदार ओळखपत्र/ जन्म प्रमाणपत्र/ शाळा सोडल्याचा दाखला.
महत्वाच्या तारीख
योजनेची सुरुवात | 01 जुलै 2024 |
योजनेची अंतिम तारीख | 15 ऑगस्ट 2024 |
लाडकी बहिण योजना साठी पात्रता
- सर्वात महत्वाचे म्हणजे महिला हि महाराष्ट्र राज्यतील रहिवासी पाहिजे.
- महिलेचे वय हे किमान 21 वर्ष ते कमाल 65 वर्ष या दरम्यान पाहिजे. वय अधिक किंवा कमी असल्यामुळे अर्ज रद्द करण्यात येईल.
- कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे.
- कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार नाही.
- महिलेचे नावावर चार चाकी किंवा घरामध्ये चार चाकी वाहन नसावे.
माझी लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज
माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज (Mazi Ladki Bahin Yojana Apply) हे दोन प्रकारे केलेले आहेत. तर ज्या महिलांना ऑनलाईन बद्दल काही समजत नाही अशा महिलांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज केलेत आणि ज्या महिला शिकल्या आहेत त्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. तर माझी लाडकी बहिण योजना साठी अर्ज कशा प्रकारे करायचे आहे हे खालीलप्रमाणे दिलेले आहे.
1. ऑनलाईन अर्ज
ऑनलाईन अर्ज सुरुवातीला Narishakti Doot वरती भरण्यात आलेले नंतर इथे एवढे अर्ज सांभाळता येत नाही त्यामुळे महाराष्ट्र सरकार द्वारे एक वेबसाईट सुरु केली या वेबसाईट चे नाव www.ladakibahin.maharashtra.gov.in. या संकेतस्थळावर नवीन अर्ज स्वीकारण्यात येत होते आणि ज्या महिलांनी अर्ज केले आणि पात्र होत्या त्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. पात्रतेसाठी महिलांकडे सर्व कागदपत्रे आणि वयाची अट तसेच इतर नियम व अट मध्ये पात्र पाहिजेत तरच त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. महाराष्ट्र सरकार कडून माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज हे बंद आहेत परंतु लाडकी बहिण योजना मधूनच एक नवीन योजना लाडकी बहिण घरकुल योजना 2025 हि योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकार महाराष्ट्र महिलांसाठी सादर करणार आहे. त्यामुळे ऑनलाईन अर्जची लिंक परत सुरु केली जाईल.
2. ऑफलाईन अर्ज
ज्या महिला अशिक्षित होत्या त्यांना महाराष्ट्र सरकार कडून अर्ज हे जवळच्या अंगणवाडी मध्ये किंवा ग्रामसेवक मध्ये अर्ज भरून जमा करायचे होते अर्जाचा नमुना तुम्हाला खाली देण्यात आलेला आहे. जर अजून अर्ज हे सुरु झालेत तर लवकरात लवकर अर्ज भरून घ्या कारण खूप अशा महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले नाहीत.
अशा प्रकारे आजचा लेखामध्ये आपण माझी लाडकी बहिण योजना बद्दल संपूर्ण माहिती बगितली आहे. या योजना बद्दल काही अडचणी आल्यावर किंवा तुमचा प्रश्न असतील तर आमचा सोबत संपर्क करा.
1 thought on “माझी लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज | Mazi Ladki Bahin Yojana Apply”