Majhi Ladki Bahin Yojana 2025 – आज आपण माझी लाडकी बहिण योजना बद्दल चर्चा करणार आहेत. माझी लाडकी बहिण योजना हि महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे २०२४ मध्ये या योजनेची निर्माण झाली होती या योजनेमधून प्रत्येक पात्रता महिलांना पैसे देण्यात आले होते तर हि रक्कम दर महिन्याला 1 हजार 500 रुपये फक्त महाराष्ट्र महिलांना देण्यात आलेले. माझी लाडकी बहिण योजना सुरु करण्याचे एकाच उद्देश होता कि ज्या महिलांना पैशाची गरज आहे त्यांना महाराष्ट्र सरकार कडून मदत मिळावी त्यामुळे हि योजना दिनांक 01 जुलै 2024 रोजी जाहीर केली होती.
Majhi Ladki Bahin Yojana 2025 | माझी लाडकी बहिण योजना
माझी लाडकी बहिण योजना महाराष्ट्र राज्यात सुरु करण्यात आलेली तर या योजनेचा लाभ फक्त महिलांना मिळत आहे. ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत त्यांना 1,500 रुपये बँक खाते मध्ये महिन्याला जमा होतात तर आज पर्यंत या योजनेतून एका महिलाला 7,500 रुपये आता पर्यंत रक्कम मिळाली आहे कारण या योजनेचे पैसे हे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या पाच महिन्याचे पैसे आता पर्यंत महिलांना मिळाले आहेत.
महाराष्ट्र सरकार कडून सन २०२५ मध्ये एक नवीन घोषणा करण्यात आलेली आहे आणि या घोषणा मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाकडून हि घोषणा केली गेली आहे. तर या घोषणा मध्ये आता माझी लाडकी बहिण योजनेतून महिलांना 2,100 रुपये देण्यात येणार आहेत. त्या महिलांना आता पर्यंत 1,500 रुपये पैसे मिळत होते ते आता वाढवून 2,100 रुपये दर महिन्याला मिळणार आहेत.
तसेच लाडकी बहिण योजना मधून ज्या महिलांना लाभ मिळते त्यांना आता घरकुल सुद्धा देण्यात येणार आहे त्यामुळे प्रत्येक महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. केंद्र सरकारआणि महाराष्ट्र सरकार द्वारे लाडकी बहिण घरकुल योजना काढण्यात येणार आहे. ज्या महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळतो अशा महिलांना घरकुल सुद्धा देण्यात येणार आहे. लाडकी बहिण घरकुल योजनाची अधिक माहिती साठी खाली पोस्ट वाचा.
Mazi Ladki Bahin Yojana Last Date
महाराष्ट्र सरकार द्वारे माझी लाडकी बहिण योजना सन २०२४ मध्ये आयोजित केली होती. या योजनेसाठी महाराष्ट्र महिलांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले तर ज्या महिलांचे वय 21 वर्ष 65 वर्षा पर्यंत होते त्यांचाकडून ऑनलाईन अर्ज 01 जुलै 2024 रोजी पासून भरण्यात आलेले तसेच या योजनेसाठी शेवटची दिनांक हि वारंवार वाढवण्यात आलेली तर शेवटची अंतिम दिनांक हि 15 ऑगस्ट 2024 रोजी होती. ज्या महिलांकडे सर्व कागदपत्रे होते त्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. दर महिन्याला २०२४ मध्ये 1,500 रुपये मिळत होते परंतु आता सन २०२५ मध्ये 2,100 रुपये मिळणार आहेत.
Mazi Ladki Bahin Yojana Apply Online
माझी लाडकी बहिण हि योजना महाराष्ट्र मध्ये महिलांसाठी सुरु करण्यात आलेली या योजनेसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात आलेले तर ज्या महिलांनी अर्ज केले त्यांना दुसऱ्या महिन्यापासूनच लगेच पैसे बँक खाते मध्ये जमा झालेले. परंतु ज्या महिलांचे अर्ज मजूर नंतर झाले अशा महिलांना सुद्धा पैसे हे तेवढेच मिळाले म्हणजे सर्व महिलांना आता पर्यंत 2024 मध्ये एकूण 7,500 रुपये एवढे पाच महिन्याचे रक्कम मिळाली आहे. महाराष्ट्र सरकार कडून अजून ऑनलाईन अर्ज सुरु होतील परंतु ज्या महिलांनी अजूनही अर्ज केले नाही त्यांनी या www.ladkibahin.maharashtra.gov.in संकेतस्थळावर जावून ऑनलाईन अर्ज करायचे आहे.